सत्तेसाठीच भास्कर जाधव शिवसेनेत- राष्ट्रवादी काँग्रेस

दमदार उमेदवार देवून पराभव करु

मुंबई: सत्तेची चटक लागल्यानेच भास्कर जाधव शिवसेनेत गेले आहेत परंतु त्यांचा येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार पराभव करून याचा बदला घेईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांनी दिला आहे.

गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी आज शिवसेना प्रवेश केला त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

भास्कर जाधव हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. ते शिवसेनेत असताना त्यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच पराभव केला होता. पराभव झाल्यावर ते राष्ट्रवादीत आले. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. विधानसभा देण्यात आली. मंत्री करण्यात आले. परंतु आता ते सत्तेसाठी शिवसेनेत गेले आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

येत्या निवडणुकीत त्यांच्यासमोर दमदार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस देईल आणि त्यांचा पराभव करेल असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.