Karnataka News | कर्नाटकातील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यतनाल यांच्यावर एका वक्तव्यावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांनी एका जाहीर सभेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे मंत्री बीझेड जमीर अहमद खान यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
काँग्रेसचे नगराध्यक्ष परशुराम होसमनी यांच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गांधी चौक पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अपमान करणे, शांतता भंग करणे आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणे या प्रकरणी बसनगौडा पाटील यत्नल यांच्याविरोधात गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Karnataka News |
भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांनी काँग्रेस नेत्यावर अपमानास्पद वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशी वक्तव्य केली आहेत .बसनगौडा पाटील यतनाल म्हणाले होते की, त्यांच्या पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी 1,000 कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत.
मात्र, या नेत्याचे नाव त्यांनी उघड केले नाही. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एस मनोहर यांच्या तक्रारीच्या आधारे, हाय ग्राउंड्स पोलिसांनी भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 192 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा: