वाडियापार्क येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

नगर: जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती व मेक्‍सिमस यांच्या संयुक्‍त विद्यमाने 6 ते 15 वयोगटासाठी मुलांसाठी वाडियापार्क येथे दि. 31 मे 2019 पर्यत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात विविध खेळांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहे. मुलांचे उपजत गुण लक्षात घेऊन भविष्यात कोणता खेळ योग्य त्याबाबत पालकांनाही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे म्हणाले, गेझेटच्या दुनियेमधून बाहेर काढून दवाखान्यात पैसे खर्च करण्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाकडे वळविण्यासाठी पालकांनी लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक पालक व विद्यार्थ्यांनी किमान 1 तास मैदानावर येणेसाठी वेळ द्यावा, वाडियापार्क येथे मोफत जिम सुविधा उपलब्ध आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थी यांना आय लव्ह नगरच्या कॅपचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू सुरेखा शिरसाठ व राष्ट्रीय खेळाडू पल्लवी, सॅनिया यांच्या परिश्रमामुळे शिबीर प्रभावी व यशस्वी होईल. असे नावंदे म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.