बारामती -करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांसाठी नगरपरिषदेने खास “बीएनपी केअर्स’ (इछझ उरीशी) ऍपची निर्मिती केली आहे. ऍपचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्षा तरन्नुम सय्यद, गटनेते सचिन सातव व ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर उपस्थित होते. ऍपमुळे नागरिकांना ऍपमधील प्रश्नांच्या उत्तराच्या आधारे स्व चाचणी करता येईल व जनजागृती होण्यास मदत होणार आहे. ऍपच्या माध्यमातून विविध ठिकाणचे संपर्क क्रमांक व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.
बारामतीमधील हॉस्पिटल्स, क्वारंटाइन सेंटर व आयसोलेशन सेंटर याबद्दलची माहिती दिली आहे. नागरिकांची भीती कमी होईल, असा विश्वास मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी व्यक्त केला. हे ऍप डाटाविव टेक्नोलॉजीस यांनी बायर प्रयास फाउंडेशनच्या सहायाने विकसित केले आहे.