“चैतन्य पदस्पर्श पादुकादर्शन सोहळा’

रवींद्र आप्पा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त 

तळेगाव दाभाडे – येथील भाजपा युवा मोर्चा माजी मावळ तालुकाध्यक्ष व मावळ प्रबोधिनीचे संस्थापक-अध्यक्ष रवींद्र (आप्पा) भेगडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा गुरुवारी (दि. 25) विविध समाजपोयोगी उपक्रमातून साजरा करण्यात आला. रवींद्र (आप्पा) भेगडे यांना राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

तळेगाव दाभाडे येथील सद्‌गुरू सेवा मंडळ आणि मावळ तालुक्‍यातील गुरुदेव दत्त परिवारातील भक्‍तगण यांनी आयोजित केलेल्या “चैतन्य पदस्पर्श पादुका दर्शन सोहळा’ या विशेष धार्मिक कार्यक्रमात हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. या वेळी तळेगाव दाभाडे शहरातील विविध भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

तालुक्‍यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण, रुग्णांना फळवाटप, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृद्धाश्रमामध्ये शिधावाटप, चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन केले. रवींद्र (आप्पा) भेगडे यांना पुस्तक व वही देवून अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जमा झालेली पुस्तके व वह्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे संयोजक नगरसेवक अमोल शेटे, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक रघुवीर शेलार आणि सामाजिक कार्यकर्ते विनीत दत्तात्रय भेगडे यांनी सांगितले.

या वेळी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, एकनाथ टिळे, ज्ञानेश्‍वर दळवी, राजाराम शिंदे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, सुरेशभाई शहा, यशवंत नागरी सहकारी बॅंकेचे पांडुरंग खेसे, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, तालुका प्रभारी भास्कर म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, नगरसेवक सुनील ढोरे, अमोल शेटे, रघुवीर शेलार, अरुण भेगडे, शोभा भेगडे, कल्पना भोपळे, प्राची हेंद्रे, संतोष भेगडे, सुरेश भोईर, गणेश मावकर, संतोष शिंदे, संदीप शेळके आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.