बार्सिलोना लीगचे विजेतेपद मिळवण्याच्या दिशेने

बार्सिलोना – अखेरच्या मिनिटांत लुईस सुवारेज आणि लीयोनाल मेस्सीने केलेल्या गोलच्या जोरावर बार्सिलोना ने ला लीग मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अटलेटिको माद्रिद संघाचा 2-0असा पराभव केला. सुवारेजने 85 व्या मिनिटाला तर मेस्सीने 86 व्या मिनिटाला गोल केले. या विजयामुळे बार्सिलोना स्पॅनिश लीग जिंकण्याच्या नाजिक पोहचले आहे.

पाहिल्या सत्राच्या सुरुवातीला बार्सिलोना संघाने काही आक्रमक चाली रचल्या. परंतु त्यावर गोल करण्यात त्यांना अपयश आले. 28 व्या मिनिटाला माद्रिदचा खेळाडू दियोगो कोस्टा याला रेड कार्ड दाखावण्यात आले. त्यामुळे माद्रिद ला 10 खेळाडूंसह खेळावे लागले. पाहिल्या सत्रता दबदबा रखूनही बार्सिलोनाला गोल करत आला नाही. त्यामुळे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिले.

दुसऱ्या सत्रात ही बार्सिलोना चे वर्चस्व राहिले. मेस्सीने सुवारेज आणि कोटिन हो साठी काही संधी निर्माण केल्या होत्या. पण त्यावर गोल झाला नाही. मात्र, 85 व्या मिनिटाला सुवारेजने गोल करत बार्सिलोनाला 1-0ने आघाडी मिळवून दिली. तर पुढील काही मिनिटातच मेस्सीने गोल करत ही आघाडी 2-0 ने वाढवत संघाला विजय मिळवून दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.