Food: हिवाळ्यात शरीराला उब देणारा आहार खूप गरजेचा असतो. अशा वेळी अनेक सुपरफूड्स असले, तरी बाजरीची सर काही वेगळीच आहे. बाजरीची तासीर उष्ण असते आणि त्यात गूळ मिसळला की शरीराला आतून छान उब मिळते. बाजरीची भाकरी तर आपण सगळेच खातो, पण बाजरीचा चूरमा चाखला आहे का? हा चूरमा चवीला गोड, पौष्टिक आणि खूपच एनर्जी देणारा असतो. राजस्थान आणि हरियाणामध्ये ही डिश पारंपरिक पद्धतीने बनवली जाते. अगदी सोप्या साहित्याने घरीही तुम्ही स्वादिष्ट चूरमा तयार करू शकता. बाजरीच्या चूरम्यासाठी लागणारे साहित्य बाजरीचं पीठ – २ कप गूळ – १ कप देशी तूप – अर्धा कप वेलची पावडर – अर्धा लहान चमचा बदाम – आवश्यकतेनुसार काजू – आवश्यकतेनुसार पिस्ते – आवश्यकतेनुसार कोमट पाणी – गरजेपुरतं मीठ – चिमूटभर (ऐच्छिक) Bajre ka Churma बाजरीचा चूरमा बनवण्याची सोपी पद्धत 1. सर्वात आधी बाजरीच्या पिठात चिमूटभर मीठ घाला आणि कोमट पाण्याने मऊ पीठ मळून घ्या. 2. या पिठाच्या गोळ्या करून थोड्या जाडसर भाकऱ्या लाटा. 3. तव्यावर मंद आचेवर या भाकऱ्या दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजा. 4. भाकऱ्या गरम असतानाच त्यांचे छोटे तुकडे करा. हवे असल्यास मिक्सरमध्ये हलकं दरडरं वाटू शकता. 5. आता कढईत थोडं तूप गरम करा आणि त्यात गुळाचे छोटे तुकडे घाला. 6. गूळ वितळू लागल्यावर त्यात बाजरीचं मिश्रण घाला. 7. वरून भरपूर देशी तूप, वेलची पावडर आणि भाजलेले ड्रायफ्रूट्स घालून सगळं नीट मिसळा. तयार आहे गरमागरम बाजरीचा चूरमा चांगलं मिसळल्यानंतर तुमचा बाजरीचा चूरमा तयार! हा चूरमा तुम्ही थेट खाऊ शकता किंवा त्याचे छोटे लाडू करून साठवूनही ठेवू शकता. हिवाळ्यात शरीराला ताकद देणारा, गोड आणि पौष्टिक असा हा चूरमा नक्की करून पाहा.