विजयसिंह मोहिते पाटलांचा सत्कार करणे हे माझं भाग्य समजतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोलापूर – राजकीय जीवनातील 50 वर्षे ही फार मोठी असतात. विजयसिंह मोहिते पाटील यांची 50 वर्षाची कारकीर्द आहे. अशा विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची स्तुती केली.

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपप्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील पहिल्यांदाच भाजपच्या मंचावर आले. यामुळे त्यांचा मोदींच्या हस्ते सत्कार केला.

मोदी म्हणाले, मोहिते-पाटलांचा सन्मान करणे हे माझं भाग्य आहे. मी स्वतःला भाग्यशाली मानतो. सार्वजनिक जीवनात त्यांनी कुठल्याही पक्षात काम केलेले असो, त्यांचे काम मोठे आहे. त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि दिर्घआयु लाभो आणि त्यांना देश आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची आणखी शक्ती लाभो, असे मोदी म्हणाले.

जे दिल्लीत बसले आहेत, त्यांना जमिनीवरील सत्य माहिती नाही. ही गर्दी त्या लोकांनी पाहावी, मग त्यांच्या लक्षात सत्य स्थिती येईल. मला आता लक्षात आलं की शरदराव यांनी मैदान का सोडले. ते मोठे खेळाडू आहेत. ते वेळेआधी हवेच रूप ओळखतात. दुसरं कुणी बळी गेलं तरी चालेल. पण ते आपल्या परिवाराचं आणि आपलं नुकसान कधी होऊन देत नाहीत. त्यामुळेच ते मैदान सोडून पळाले, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.