शिक्रापूर (पुणे) – येथील एका माजी सरपंचांना चार दिवसांपूर्वी करोनाची बाधा झाली होती. आत्ता त्यांच्या संपर्कातील माजी उपसरपंचांनाही करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
शिक्रापूर येथे करोनाचा शिरकाव झाल्यानंतर गावामध्ये विविध उपाययोजना राबविणाऱ्या तसेच करोनाबाधित मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेणाऱ्या एका माजी सरपंचालाचा करोनाची बाधा झाल्याचे चार दिवसांपूर्वी समोर आले होते.
त्यांच्या संपर्कातील एका माजी उपसरपंचाला त्रास जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी केली, त्यावेळी त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे गावातील नागरिकांनी चांगला धसका घेतला आहे.