नियमांचं पालन करा! पोलीस अॅक्शन मोडमध्ये; मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू

-रामचंद्र सोनवणे

राजगुरूनगर – करोनाच्यापार्श्वभूमीवर राजगुरूनगर शहरात पुन्हा मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. खेड पोलीस आणि राजगुरूनगर नगर परिषदेचे कर्मचारी यांच्या माध्यमातून मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींकडून दंड वसूल केला जात आहे तरीही नागरिक रस्त्यावर विनामास्क फिरत आहेत. कारवाई करणाऱ्या पोलिसांना विनामास्कवाले मात्र दमबाजी करीत असल्याचे चित्र तालुक्यात आहे.

राजगुरुनगर शहरासह तालुक्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दररोज सरासरी १५ ते २० नागरिक पॉझिटिव्ह सापडत असल्याने तालुक्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेली पंधरादिवसांपासून करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. राजगुरूनगर सह चाकण आळंदी नगर परिषद हद्दीत आणि त्याजवळील गावांमध्ये करोनाचे प्रमाण जास्त असल्याने संख्या झपाट्याने वाढत आहे.

खेड तालुक्यासह जिल्हा आणि राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने अधिकारी यंत्रणा सतर्क झाली आहे. करोनाचा वाढत्या प्रादुर्भाव पहाता खेड तालुक्यात आता हळूहळू लाँकडाऊन प्रक्रीया सुरु करण्यासाठी प्रशासनाने सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन त्यात खबरदारीची उपाययोजना करण्याचे निर्देश प्रांत विक्रांत चव्हाण यांनी दिले आहेत.

प्रांत अधिकाऱ्यांनी आदेशांची खेड पोलीस आणि राजगुरूनगर नगर परिषद यांनी तात्काळ अंमलबजावणी करून विना मास्क घालून प्रवास करणाऱ्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी जमलेल्या व्यक्तींवर कारवाईला सुरुवात केली आहे. शहरातील अनके भागात पोलीस आणि नगर परिषदेचे कर्मचारी यांची दंडात्मक कारवाई सुरु झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.