चेक गणराज्य – चेक गणराज्यमधील प्रसिद्ध गायिका हाना होरका यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. हाना होरका यांनी वयाच्या 57व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. धक्कादायक म्हणजे गायिका हाना यांनी करोनाची लस घेतली नव्हती.
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये प्रकृती ठिक असल्याचे त्यांनी म्हटले होते. चेक गणराज्य येथील प्रसिद्ध गायिका हाना होरका या असोनेंस बॅंडच्या गायिका होत्या. हाना यांचा मुलगा रेक याने एका रेडिओ शोमध्ये सांगितले की, त्याची आई हाना होरका यांनी करोनाची लस घेतली नाही. तसेच मला आणि माझ्या वडिलांना करोनाची लागण झाली होती. त्यावेळी आई आमच्यासोबतच राहात होती. त्यामुळे तिलाही करोनाची लागण झाली.
दरम्यान, हाना या लसीकरण विरोधी मोहिमेत सहभागी होत्या. त्यांच्याकडे हेल्थ पास होता. त्यानंतर हाना यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, हेल्थ पास ज्यांच्याकडे असतो. त्यांना सिनेमागृहात तसेच स्टिम बाथ सेंटर येथे जाण्याची परवानगी मिळते. चेक येथे बार, कॅफे आणि सिनेमागृहांमध्ये लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळतो.