अहिल्यादेवी होळकर उद्यानात ‘फॉग फाऊंटन’

धनकवडी – पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान मोरे बाग वंडरसिटी कात्रज येथे नगरसेवक वसंत मोरे यांच्या विकास निधीतून दक्षिण पुण्यामध्ये पहिला “फॉग फाऊंटन’ (मयूर कारंजे) बसविण्यात आला. कात्रज परिसरामध्ये नवीन संकल्पना आणण्यास वसंत मोरे हे नेहमीच अग्रेसर असतात. या “फॉग फाऊंटन’चे उद्‌घाटन प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते प्रवीण तरडे व रमेश परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर, मनसे उपाध्यक्ष गणेश सातपुते, किशोर शिंदे, बाबू वागस्कर, संतोष पाटील, योगेश खैरे उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप जगताप यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.