अनुदानाअभावी चारा छावणीचालक हैराण

अनेक छावण्या बंद पडण्याच्या मार्गावर; पशुधन धोक्‍यात

छावणीवर रोज होतोय 37 लाखांवर खर्च

नगर तालुक्‍यात एकूण 59 छावण्या सध्या सुरू आहेत. यामध्ये लहान जनावरांची संख्या एकूण 6 हजार 455 तर मोठ्या जनावरांची संख्या 38 हजार 451 असून तालुक्‍यात 36 हजार 089 जनावरांना छावणीचा दिलासा मिळाला आहे. यावर दैनंदिन खर्च लहान जनावरांचा 2 लाख 90 हजार 475 तर मोठ्या जनावरांचा 34 लाख 60 हजार 590 असा एकूण 37 लाख 51 हजार 65 रुपये दैनंदिन खर्च आहे.

नगर – जिल्हाभरात आजमितीस जनावरांसाठी 460 चारा छावण्या सुरू असून, या छावण्यांत तब्बल 2 लाख 85 हजार 260 जनावरांना आसरा देण्यात आला आहे. तसेच जनावरांसाठी चार उपलब्ध करण्यासाठी छावणी चालकांची मोठी कसरत होत असून छावणी चालक हैराण झाले असून या छावणी चालकांना अनुदानाची प्रतिक्षा आहे. लवकरात लवकर प्रशासनाने हे अनुदान द्यावे व जिल्ह्यातील पशुधन वाचवावे, अशी मागणी छावणी चालकाकंडून होत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, जिल्हा दुष्काळात होरपळत आहे. पाण्याअभावी खरीप हंगाम हाती लागला नाही. परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे रब्बी पिके देखील उगवली गेली नाहीत.

डिसेंबर महिन्यापासून चारा टंचाई निर्माण झाली. पावसाअभावी भूजलपातळी खालावली गेली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढू होऊ लागली आहे. जनावरांना चारा आणि पाणी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेऊन पशुपालकांना दिलासा दिला. मात्र चारा छावण्या सुरू होऊन दीड महिना झाला आहे. छावणीचालकांना अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी छावणी चालकांकडून होत आहे. मार्च अखेरपर्यंत 340 छावण्यांचे 20 कोटी रुपये अनुदान देणे बाकी आहे. या अनुदानाचा मागणी प्रशासनाने शासनाकडे केली आहे. परंतु अजूनही अनुदान आलेले नाही.

अनुदान उपलब्ध होत नसल्याने सध्या छावणीचालकांना पदर पैसे उपलब्ध करावे लागत आहे. चारा व पाणीच्या उपलब्धता करतांना कसरत होत आहे. त्या चारा शिल्लक नसल्याने तो चढत्या भावाने खरेदी करावा लागत आहे. आज दीड महिला लोटला तरी अनुदान न मिळाल्याने कर्ज काढून जनावरांना चारा व पाणी उपलब्ध केले जात आहे. परंतु येत्या काही दिवसांत अनुदान मिळाले नाही तर चारा छावणी चालकांना छावणी बंद केल्याखेरीच पर्याय राहणार नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे तातडीने अनुदान देण्यात यावे अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात नवीन अनुदानानुसार छावण्यांवर दररोज सव्वादोन कोटी रुपये खर्च येत आहे. शासनाकडून अनुदान उपलब्ध झाले नसल्याने छावणीचालकांत नाराजी दिसत असून अनेक छावण्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पशुधन देखील उघड्यावर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

40 लाखांहून अधिक खर्च

चारा छावणी सुरू करण्यासाठी शासनाने छावणी चालकांना 40 लाख रुपयांचे ही पत्र घेऊन छावणी चालकांना परवानगी दिली. मात्र जिल्ह्यातील काही छावणी चालकांचा खर्च 40 लाखांहून अधिक झाला आहे. त्यासाठी लवकरात लवकर शासनाने छावणी चालकांना अनुदान प्रशासनाने द्यावे, अशी मागणी होत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.