माझ्यावर टीका करण्यापेक्षा राज्याकडे लक्ष द्या – कंगना

भिवंडीतील घटनेवरुन सरकारला टोला

मुंबई – माझ्यावर सातत्याने टीका करण्यापेक्षा राज्यातील स्थितीकडे लक्ष द्या, राज्य कोलमडायला वेळ लागणार नाही हे अजून तुम्हाला लक्षात आलेले दिसत नाही, अशा शब्दात अभिनेत्री कंगना रणावतने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला टोला हाणला आहे.

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळच नाही. त्यांचे अजूनही क-क-क कंगना हेच सुरु आहे. त्यांनी माझ्यावर टीका करणे थांबवले तर राज्य कसे कोलमडत आहे हे सरकारला लक्षात येइल, असे ट्‌विट कंगनाने केले आहे.

कंगनाने शेतकरी आंदोलकांना दहशतवादी संबोधल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आला होता. त्यावरही कंगनाने विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे. 

पंतप्रधान मोदीजी, जे झोपले आहे त्यांना जागे करता येईल मात्र, जे झोपेचे सोंग करत आहेत त्यांना कसे समजावून सांगणार, असेही ट्‌विट कंगनाने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.