विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा!

डॉ. दीपक शहा यांचे आवाहन ः प्रा. ब्रिजेश देशमुख यांना “पीएचडी’ 

चिंचवड – प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा, असे आवाहन कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी केले चिंचवड येथील कमला शिक्षण संस्था संचलित प्रतिभा महाविद्यालयातील प्रा. ब्रिजेश शंकरराव देशमुख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून इंग्रजी विषयात “पीएचडी’प्रदान करण्यात आली.

त्यानिमित्ताने महाविद्यालयाकडून त्यांचा डॉ. शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या जयश्री मुळे, प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वनिता कुऱ्हाडे उपस्थित होते.

डॉ. दीपक शहा म्हणाले, आजही ग्रामीण व शहरी भागातही अनेक विद्यार्थी इंग्रजी विषयाची नाहक भीती बाळगतात. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजी भाषेबद्दलची भीती प्राध्यापकांनी दूर करून त्यांच्या शंकांचे निरसन वेळोवेळी करायला हवे. इंग्रजी ही जागतिक भाषा असून आजच्या स्पर्धेच्या युगात ती प्रत्येकाला अवगत असणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्या वनिता कुऱ्हाडे यांनी केले. प्रा. सुनिता पटनाईक यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.