निवडणुकीत मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर राहणार लक्ष

बेकायदेशीर रकमेची माहिती आयकर विभागास द्या


विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आदेश

पुणे – येत्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवा. त्याचबरोबर बेकायदेशीर रक्कम आढळल्यास त्याबाबतची माहिती आयकर विभागास देण्यात यावी, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सोमवारी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणुकीशी निगडित अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मितेश घट्टे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त प्रताप जाधव आदी उपस्थित होते.

निवडणूक काळात मोठ्या रकमेच्या व्यवहारावर लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी बॅंक अधिकारी यांची मदत घ्यावी. रकमेची बेकायदेशीरपणे वाहतूक होऊ नये यासाठी वाहनांची तपासणी करावी. वाहनांच्या तपासणीत बेकायदेशीर रक्कम आढळल्यास काय कार्यवाही करावी, याच्या सूचना भरारी पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात याव्यात.

त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. टपाली मतदान प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन करा, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे होण्यासाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्याबरोबरच अन्य आवश्‍यक सुविधा द्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करा. तसेच निवडणूक आयोगाला आवश्‍यक असणारी माहिती वेळेत आणि अचूक सादर करा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)