252 मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांचे लक्ष

जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांमधील निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण

पुणे – निवडणूक आयोगाच्या निकषानुसार विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील 252 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक लक्ष ठेवणार आहे. तसेच, निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

एखाद्या मतदान केंद्रावर सर्वांत कमी मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र आहे. त्या मतदान केंद्रावर सिंगल व्होटरची संख्या अधिक आहे. तसेच, ज्या मतदान केंद्रामध्ये 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले असेल आणि झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्‍के मतदान एकाच उमेदवाराला झालेले असेल अशा मतदान केंद्रांचे सर्वेक्षण करून त्या मतदान केंद्रांचा समावेश संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये करण्यात आला आहे.

जेथे हिंसक घटना घटल्या असून त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये अडथळा आला असेल. तसेच मतदार यादीमध्ये जास्त मतदारांचे छायाचित्र नसणे आदी बाबींचा विचार करून या मतदान केंद्रांचा समावेश संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये करण्यात येतो.

संवेदनशील मतदार केंद्रासाठी 252 सुक्ष्म निरीक्षकांची नेमणूक केली आहे. हे अधिकारी प्रत्यक्ष मतदानावेळी मतदान केंद्रांमध्ये पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सूक्ष्म निरीक्षक मतदान केंद्राच्या परिस्थितीचा अहवाल केंद्रीय निवडणूक निरीक्षकांना त्याचदिवशी पाठविणार आहेत.

जिल्ह्यातील संवेदनशील मतदार केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये. यासाठी या मतदान केंद्रावर अधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे. तसेच, या मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संवेदनशील मतदान केंद्र निवडीचे निकष
– मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र असण्याचे प्रमाण कमी आहे.
– यादीमध्ये मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांचे प्रमाण जास्त आहे.
– ज्या मतदान केंद्रावर यापूर्वी 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. तसेच, या ठिकाणी एकाच उमेदवाराला 75 टक्‍के मतदान मिळाले आहे.
– मतदान केंद्रावर गोंधळ, भांडणे, गैरप्रकार किंवा वारंवार एकाच मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड होणे.

संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या
जुन्नर -7, आंबेगाव -8, खेड-आंळदी -9, शिरूर- 8, दौड -9, इंदापूर -15, बारामती -17, पुंरदर- 5, भोर- 5, मावळ- 18, चिंचवड -12, पिंपरी- 19, भोसरी – 8, वडगावशेरी- 16, शिवाजीनगर -14, कोथरूड- 9, खडकवासला- 13, पर्वती -15, हडपसर- 17, पुणे कॅन्टोन्मेंट-15, कसबा पेठ- 15.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)