एलियन्स म्हणजेच परग्रहांवरील जीवांशी संबंधित अनेक बातम्या बर्याच काळापासून पाहिल्या आणि ऐकल्या जात आहेत. लॉकडाऊनमध्ये एलियन्सशी संबंधित अनेक बातम्या येत होत्या. आता अमेरिकेतील फ्लोरिडात लोकांना आकाशात पक्ष्याऐवजी मासे उडताना पाहून आश्चर्य वाटले. ही बाब काही दिवसांपूर्वीची आहे. इथे माशासारखी वस्तू आकाशात उडताना दिसली. मात्र,अमेरिकेने याचा इन्कार केला आहे. तेव्हापासून एलियन हंटरमध्ये खळबळ उडाली आहे. आकाशात उडणाऱ्या या माशसदृश वस्तूला ‘फ्लाइंग फिश’ असे नाव देण्यात आले आहे. काही लोक म्हणतात की हे एलियन्सचे स्पेसक्राफ्ट आहे, तर काही लोक म्हणाले की हा मासा एलियन्सने उडवला होता. एवढेच नाही तर या उडत्या माशाचे छायाचित्र UFOsightingdaily.Com वर शेअर केले होते.
एलियन तज्ज्ञ स्कॉट वारिंग यांच्या म्हणण्यानुसार, अलीकडच्या काही दिवसांत त्यांच्या लक्षात आले आहे की, जिथे जिथे एलियन आणि यूएफओ दिसत आहेत, तिथे त्यांचा आकार पृथ्वीवरील वस्तूंसारखाच आहे. पण माशासारखा दिसणारा असा UFO किंवा एलियन त्याने पहिल्यांदाच पाहिला आहे. व्हायरल होत असलेल्या या एलियन फिशमध्ये समोर दोन डोळे दिसत आहेत आणि त्याचा मागचा भाग माशाच्या पंखासारखा आहे.
तज्ञांनी याचा संबंध पाण्याखाली असलेल्या गुप्त एलियन बेसशी देखील जोडला. एलियन तज्ज्ञ स्कॉट वारिंग सांगतात की समुद्राखालूनही एलियन बेस जगात आहे. मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. फ्लोरिडामध्ये एलियन्स दिसणे ही नवीन गोष्ट नाही. यूएफओ आणि एलियन्स येथे दिसतात. आता या उडत्या माशाचा शोध घेतला जात आहे.