सकारात्मकतेसाठी बासरी

वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत. त्यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धी येते. पण सर्वांनाच कठीण आणि महागडे वास्तूउपाय करणे शक्‍य नसते. अशा वेळी कामी येते ती बासरी. बासरी घरात ठेवल्यास सकारात्मकता येते आणि सुखसमृद्धी जाणवते.

घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी आपण अनेक प्रयोग करत असतो, पण अनेकदा कौटुंबिक वातावरण बिघडते आणि अशांतता पसरते. त्यामुळे समस्येवरील उपाय मिळत नाही. वास्तू शास्त्रानुसार या समस्येवरील उपाय म्हणून घरात बासरी ठेवावी. त्याचा फायदा होतो.

घरात बासरी ठेवल्यास घरातील वास्तुदोष दूर होतात. घरात आनंदी, समाधानी वातावरण निर्माण होते. भगवान श्रीकृष्णांची बासरी आवडती होती ती कायम त्यांच्याबरोबर असे. प्रेम आणि शांततेचा संदेश देणारी बासरी श्रीकृष्णांची शक्ती होती. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये लाकडाची बासरी असते तिथे श्रीकृष्णांचा वास असतो. त्यामुळे घरावर कृष्णांची कृपा कायम असते. बासरी घरी असेल तर घराचे धन ऐश्‍वर्य कमी होत नाही.

नकारात्मक ऊर्जा दूर होतेः बासरी संमोहन, आनंद, आकर्षण यांचे प्रतीक आहे. प्रत्येकाला बासरीचे मधुर सूर आकर्षित करतात. बासरी वाजवताना जे सूर निर्माण होतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरणात एक सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. मनाला आनंद वाटतो. बासरीच्या सुरातून प्रेमाचा वर्षाव होतो त्यामुळेच ज्या घरी बासरी असते किंवा बासरी वाजवली जाते त्या कुटुंबात परस्परांबद्दल प्रेम आणि उल्हास सदैव असतो. घरात सतत नजरेसमोर राहील अशा ठिकाणी बासरी लावावी. असे केल्यास सकारात्मक विचार वाढतात आणि आपले काम यशस्वी होण्यास मदत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.