फ्लोरिडाला पुन्हा एकदा वादळाचा फटका

ऍटलांटा – अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागाला शुक्रवारी वादळाचा जोरदार तडाखा बसला. वादळाची तीव्रता पाहता कॅरोलिना आणि व्हर्जिनियाच्या दक्षिणेकडील भागालाही पुढच्या 1-2 दिवसात वादळाचा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

फ्लोरिडमधील तलाहसीमधील वूडविल भगात एका घरावर झाड कोसळून 8 वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाला. तर 12 वर्षाचा एक मुलग जखमी झाला. याच वादळामुळे दोनच दिवसांपूर्वी मिसीसिपीमध्ये तिघे अणि अल्बानियामध्ये एका महिलेचाही मृत्यू झाला होता. आता हे वादळ पूर्वेकडे सरकले आहे. त्यामुळे जॉर्जियाचा ईशान्येकडील भाग, कॅरोलिना आणि व्हर्जिनिया या प्रांतांना धोक्‍याचा इशारा देण्यात आला आहे. रिस्टोन, फ्रेंड्रिक्‍स हॉल, बारहाम आणि फोर्कस्वाईल या भागांमध्ये सोसाट्याचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. यामुळे कच्च्या घरांचे नुकसान झाले असून आतापर्यंत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

कॅरोलिना आणि व्हर्जिनियातील 90 लाख नागरिकांना या वादळाचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. वादळामुळे मुसळधार पाऊस आणि समुद्रात मोठ्या लाटा उसण्याचीही शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.