पाकिस्तानमध्ये पूराचे 14 बळी, 26 जण जखमी

पेशावर – पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेल्या चोवीस तासांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये कमीतकमी 14 ठार तर 26 जण जखमी झाले आहेत. संततधार पावसामुळे खैबर पख्तूनख्वाचा विविध भाग आणि डोंगराच्या इस्माईल खान, हजारा आणि मलाकंद विभागातील सखल भागात पाणी साचले आहे, असे प्रांतिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे.

संततधार पावसामुळे खैबर पख्तुनख्वा प्रांतात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये किमान 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यामध्ये 26 जण जखमी झाले आहेत. चार घरे पूर्णपणे कोसळली आहेत. तर अन्य 21 घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

या जिल्ह्यांच्या जिल्हा प्रशासनाने मदत आणि बचाव कामाला सुरुवात केली आहे. या भागातील र्स्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना या भागात प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.