आंबेगाव तालुक्‍यात ओढ्या-नाल्यांना पूर

मंचर -आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील निरगुडसर, पारगाव, जारकरवाडी, अवसरी, मेंगडेवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आला होता. सिमेंटचे बंधारे पाण्याने तुडुंब भरुन वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या एक महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. गुरुवारी (दि. 27) दुपारनंतर अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, लोणी-धामणी, पारगाव इत्यादी गावांमध्ये अडीच तास मुसळधार पाऊस पडल्याने पहिल्याच पावसाच्या पाण्याने ओढ्या नाल्यांना पूर आला. मुसळधार पावसामुळे ऊस, जनावरांचा हिरवा चारा, नगदी पिकांना जीवदान मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.