मुंबई – सध्या आपल्याकडे फेस्टिव्हल सीजन सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. तर आता दसरा आणि दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
प्रत्येकालाच सणासुदीच्या काळात खरेदी करण्याची प्रचंड हौस असते. पण मनमोकळी शॉपिंग करायची झाल्यास बराच पैसा लागतो. मग तुमच्याकडे शॉपिंग करण्यासाठी पुरेशी बचत नसेल तर, काळजी करण्याचे काही एक कारण नाही.
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलकडून खरेदीची मोठी ऑफर देण्यात येणार आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन’ सेल सुरु होत आहे. तर दुसरीकडे 10 ऑक्टोबरपासून अॅमेझॉन आपला सर्वात मोठा वार्षिक सेल घेऊन येत आहे.
दरम्यान, फ्लिपकार्टच्या ऑनलाइन शॉपिंग सीझनमध्ये तुम्हाला बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्स ब्रँड्सच्या व्यापक रेंजमधून खरेदी करण्याची संधी आहे. त्यात Apple, Samsung, realme, POCO इत्यादी बड्या ब्रँड्सचा समावेश आहे.
तुम्ही स्मार्टफोन अपग्रेड करण्यासाठी सर्वोत्तम संधीची वाट पाहत असाल, तर ही हातातून सोडू नका. तसेच, इतर विविध फॅशन ब्रँडवर सुद्धा दमदार सूट मिळू शकते.