Poco C61 Offer: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सध्या अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही जर कमी किंमतीत नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. फ्लिपकार्टवर अवघ्या 6 हजारांच्या बजेटमध्ये येणारा Poco C61 देखील उपलब्ध आहे. कमी किंमतीत येणारा हा फोन दैनंदिन काम करण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनवरील ऑफर आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Poco C61 चे फीचर्स
Poco C61 मध्ये कंपनीने 6.71 इंच एचडी+ IPS LCD स्क्रीन दिली असून, याचे रिझॉल्यूशन 1650 x 720 पिक्सल, रिफ्रेश रेट 90Hz आहे. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास 3 मिळेल.
फोनमध्ये 6जीबीपर्यंत LPDDR4x रॅम आणि 128जीबीपर्यंत स्टोरेज दिले आहे. तसेच, मीडियाटेक हीलियो G36 प्रोसेसर मिळतो.
फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह येणारा 8 मेगापिक्सलचा ड्युल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात पॉवरसाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 10वॉट चार्जिंग सपोर्टसह येते.
फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-C पोर्टसह 3.5mm हेडफोन जॅक दिले आहे.
Poco C61 ची किंमत
पोकोचा हा शानदार स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 5,899 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. ही किंमत फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजव्हेरिएंटची आहे. फोनवर बँक ऑफरचाही फायदा मिळेल. याशिवाय, पोकोच्या या फोनला दरमहिना 208 रुपये ईएमआय भरूनही खरेदी करू शकता.