छोट्या उद्यागांना ई- कॉमर्सचे व्यसपीठ मिळणार ; खादी मंडळाचा फ्लिपकार्टशी सहकार्य करार

मुंबई – फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स बाजारपेठेने महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (एमएसएसआयडीसी) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ (एमएसकेव्हीआयबी) यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर उद्योग मंत्री सुभाष देसाई याचंया उपस्थितीत सह्या करण्यात आल्या.

या करारामुळे महाराष्ट्रातील स्थानिक कारागीर, विणकर, हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांना खादी, पैठणी साड्या, लाकडाची खेळणी, हाताने बनवलेल्या वस्तू, दागिने, कागदी वस्तू, पर्स आणि हस्तकलेच्या इतर वैशिष्ट्‌यपूर्ण वस्तू देशातील लाखो ग्राहकांसमोर मांडता येतील.

यात सहजपणे ऑनबोर्डिंग, मोफत कॅटलॉग तयार करणे, विपणन, अकाऊंट व्यवस्थापन, व्यवसायासंबंधी माहिती आणि गोदामाची सुविधा अशा लाभांचा समावेश आहे. यावेळी सुभाष देसाई म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात आणि राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासात एसएसएमई क्षेत्राचा मोठा वाटा आहे. आम्ही हस्तकला आणि हातमाग उद्योगाला सक्षम करण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगल्या बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा करार केला आहे.

फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कंपनी व्यवहार अधिकारी रजनीश कुमार म्हणाले, आमच्या व्यासपीठावर खरेदी करणाऱ्या 300 दशलक्ष ग्राहकांची राष्ट्रीय बाजारपेठ देशभरातील एमएसएमईना उपलब्ध करून देण्यात ई-कॉमर्स फार महत्त्वाची भूमिका बजावते. फ्लिपकार्टने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार ग्राहकांसाठी या व्यासपीठावर मराठी इंटरफेस उपलब्ध असल्याने राज्यातील ग्राहकांच्या अधिक निकट पोहोचता येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.