Flipkart Health+ सेवा लॉन्च : घरोघरी होणारऔषध वितरण; ‘या’ मोठ्या कंपन्यांमध्ये असेल जोरदार स्पर्धा

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आता हेल्थकेअर मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. फ्लिपकार्टने हेल्थ+ सेवा सुरू केली आहे ज्याद्वारे घरोघरी औषधे पोहोचवले जाणार आहे. फ्लिपकार्टने कोलकाता स्थित कंपनी Sastasundar Marketplace for Health+ विकत घेतले आहे. मात्र फ्लिपकार्टने या व्यवहाराची रक्कम उघड केलेली नाही.

ऑनलाइन मेडिसिन डिलिव्हरी मार्केटमध्ये फ्लिपकार्ट हेल्थ+ ची स्पर्धा 1mg Apollo247, Netmeds, Medlife आणि PharmEasy सारख्या कंपन्यांसोबत असेल. SastaSundar.com चे मुख्यालय कोलकाता येथे आहे आणि त्यांनी औषध वितरीत करण्यासाठी सुमारे 490 फार्मसी कंपन्यांशी आधीच भागीदारी केली आहे. यामध्ये Mitsubishi आणि Rohto Pharmaceuticals सारख्या जपानी कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.

फ्लिपकार्टने सांगितले आहे की, आपल्या Health+ सेवेद्वारे भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात खरी औषधे उपलब्ध करून दिली जातील. कंपनीने असेही म्हटले आहे की ते आगामी काळात ई-डायग्नोस्टिक आणि ई-कन्सल्टेशन सुविधा देखील प्रदान करेल.

फ्लिपकार्ट हेल्थप्लस लाँच करताना फ्लिपकार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट विकास विभागाचे प्रमुख रवी अय्यर म्हणाले की, “आम्ही SastaSundar.com वर या गुंतवणुकीद्वारे आरोग्य सेवा बाजारात प्रवेश करण्यास उत्सुक आहोत. एक अशी कंपनी जीने खऱ्या उत्पादनांद्वारे, तंत्रज्ञानाद्वारे लाखो ग्राहकांसाठी एक विश्वासू भागीदार म्हणून स्वतःची स्थापना केली आहे.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.