फ्लिपकार्ट व ऑनरदरम्यान सहकार्य करार 

नवी दिल्ली: ई कॉमर्स क्षेत्रातील कंपनी फ्लिपकार्ट व हुवेईचा सबब्रॅण्ड ऑनरने सहकार्य करार केला असून ऑनर नवा स्मार्टफोन 9 एन केवळ फ्लिपकार्टच्या व्यासपीठावरून उपलब्ध हणार आहे. पेटीएम पे फीचरचा यात समावेश केल्यामुळे डिजिटल इंडियाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर बोलताना हुवेईच्या इंडिया-गआहक विभागाचे उपाध्यक्ष पी. संजीव म्हणाले की, 11 ते 18 हजार या किमतीत उपलब्ध होणाऱ्या स्मार्ट फोनला भारतात अजूनही मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. या टप्प्यात या तीन फोनच्या किमती ठेवण्यात आल्या आहेत.
भारतामध्ये, ऑनरने वेगाने वाढणाऱ्या स्मार्टफोन ब्रॅण्डचे स्थान कायम राखले आहे. बाजारपेठेतील योगदानाच्या ताज्या अहवालांनुसार ऑनरचा समावेश आघाडीच्या 5 कंपन्यांमध्ये होतो. फ्लिपकार्टच्या मोबाइल विभागाचे वरिष्ठ संचालक अय्यप्पन राजगोपाल म्हणाले, फ्लिपकार्टचे धोरण नेहमीच ग्राहककेंद्री राहिले आहे आणि ग्राहकांना किमतीच्या प्रत्येक टप्प्यावर निवडीची सर्वोत्तम संधी देण्यावर आमचा विश्‍वास आहे. हा फोन 31 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपासून केवळ फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर व ऑनरच्या अधिकृत स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल. या उत्पादनांना तरुणांकडून अधिक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात आला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)