फ्लॅटच्या बाल्कनीत पक्ष्यांना दाणे खायला घालाता येणार नाहीत – सर्वोच्च न्यायालय 

नवी दिल्ली – फ्लॅटच्या बाल्कनीत पक्ष्यांना दाणे खायला घालता येणार नाहीत, असा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निवासी सोसायट्यांच्या उत्तुंग (हाय राईज)इमारतींच्या बाल्कन्यांमध्ये पक्ष्यांना दाणे खायला घालता येणार नाहीत, कारण त्यामुऴे इतर फ्लॅटधारकांना त्रास होऊ शकतो. असे खंडपीठाने म्हटले आहे.
या संबंधातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिला जिगीषा ठाकोर यांनी दाखल केली होती.

सदर याचिकेची सुनावणी चालू असताना न्यायमूर्ती यू यू ललित आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. जर तुम्ही निवासी सोसायट्यांमध्ये राहत असाल, तर तुम्हाला सोसायट्यांच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात 27 सप्टेंबर 2013 रोजी बॉंबे सिटी सिव्हिल कोर्टाने अंतरिम आदेशाने फिर्यादीला आपल्या बाल्कनीमध्ये पक्ष्यांना दाणे घालण्यास मनाई केली होती. त्यावर केलेल्या अपीलात बॉंबे हाय कोर्टाने सिव्हिल कोर्टाचा आदेश कायम ठेवला होता आणि आता सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.