मुंबई – चित्रपट प्रेमींसाठी २०१९ हे वर्ष अतिशय खास ठरले आहे. २०१९ या सरत्या वर्षात काही हिंदी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली तर काही चित्रपट दणकून आपटले. या यादीमध्ये खास करून बिग बजेट चित्रपटांचा मोठा समावेश आहे.
साहो – बाहुबली फेम प्रभास हा ‘साहो’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तसेच श्रद्धा कपूरही या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. दरम्यान, प्रभास हा या चित्रपटात असल्याने सर्वांना साहोची उत्सुकता लागली होती. पण बॉक्स ऑफिसवर व प्रेक्षकांच्या मनावर या चित्रपटाने जादू केली नाही.
सांड की आँख – जगातील सर्वांत वृद्ध महिला शार्पशूटर्सच्या जीवनावर आधारित ‘सांड की आँख’ हा चित्रपट विशेष चर्चेला गेला होता. तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटामध्ये अनावश्यक सीनचा मोठ्या प्रमाणात भरणा करण्यात आला असून, प्रेक्षक चित्रपटाला कंटाळले.
कलंक – धर्मा प्रोडक्शनचा कलंक हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र ज्यावेळी तो प्रदर्शित झाला त्यावेळी तो जोरदार आपटला. आलिया भट्ट, वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तरी देखील या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
मरजावां – रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मरजावां’ चित्रपटाची आधी खूप चर्चा झाली. मात्र रिलीज झाल्यानंतर तो तितका चालला नाही. या रितेश देशमुखने एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारली आहे.
दबंग ३ – २०१९ या सरत्या वर्षात अभिनेता सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट चांगलाच आपटला आहे. सलमान फॅन्स वगळता प्रेक्षकांनी या चित्रपटाला स्विकारले नाही. २० डिसेंबरला हा चित्रपट रिलीज झाला. सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर यांची चित्रपटात मुख्य भूमिका आहे.