धोम धरणाच्या जलाशयात आढळला फ्लेमिंगो

वन विभागाने सोडला भिगवणच्या नैसर्गिक अधिवासात

वाई – वाई वनपरिक्षेत्रात धोम धरणाच्या जलाशयालगत थकलेला रोहित पक्षी शिवाजीराव भोसले यांना आढळला. त्यांनी त्याबाबत वाई वनविभागाला माहिती कळवताच वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे व वनकर्मचारी यांनी जागेवर जाऊन पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील देशपांडे यांच्याकडून पक्ष्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा वैद्यकीय तपासणी करून घेतली. भिगवण येथे पक्षी तज्ज्ञांकडे चौकशी केली असता अजूनही रोहित पक्षी भिगवण येथे आहेत असे समजले. पशुधन विकास अधिकारी वाई डॉ. देशपांडे याच्या अहवालानुसार रोहित पक्षी त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे आवश्‍यक असल्याने पक्षी मित्र नितीन नगरे व शंकर नगरे यांचे मदतीने उजनी धरणाचे जलाशयात भिगवण येथे सोडण्यात आला.

हा पक्षी पाणथळ जागेत थव्याने राहणारा पक्षी आहे. भिगवण येथील उजनी धरणाच्या पाण्यात रोहित पक्ष्याला पोषक अशा उथळ जागा आहेत. काही विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. हे या पक्ष्याचे वैशिष्ट्‌य आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, सुनील सूर्यवंशी, वन कर्मचारी, पर्यावरण प्रेमी यांनी परिश्रम घेतले.

फ्लेमिंगो पक्षी भिगवण येथून स्थलांतर करतात, त्यावेळी ते पश्‍चिम घाट ओलांडून सुमुद्र काठाने कच्छच्या रण (गुजरात) येथे पोहचतात. धोममध्ये हा सापडलेला पक्षी कदाचित पेसेज मायग्रांट असावा अथवा थवा काही काळ धोम येथे विसावला असल्यास त्यामधून मागे राहिलेला असावा. त्यामुळे भिगवण येथे अजूनही अनेक फ्लेमिंगो असून येथे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)