पुणे : राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यात ध्वजारोहण पार पडले. पुण्यातील विभागीय आयुक्तालयात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
यंदा देशभरात स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष उत्साहाने साजरे होत आहे. त्याचेच औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विभागीय आयुक्तालयातील ध्वजारोहणानंतर पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, करोना योद्धे यांची भेट घेऊन विचारपूस केली. देशात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत यंदा आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.