होम क्रेडिटला फिच्‌कडून मिळाले स्थिर मानांकन

बिगर बॅंकिंग वित्त संस्थांसाठी येत आहे तेजीचा काळ

मुंबई: बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था असलेल्या होम क्रेडिट इंडिया फाइनेंसला फिंच समूहच्या कंपनी रेटिंग्स एंड रिसर्चकडून इंड ए-स्टेबल रेटिंग प्रदान केले गेले आहे. भारतातील किरकोळ कर्ज वितरण क्षेत्रात आम्ही आगामी काळात जोमाने काम करणार असल्याचे होम क्रेडिट इंडियाचे मुख्य वित्त अधिकारी अर्निबन मजुमदार यांनी सांगितले. या कंपनीला केअर रेटिंग्जद्वारे होम क्रेडिटला सुधारित बीबीबी प्लस रेटिंग प्राप्त झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनुभवी व्यवस्थापन संघ, भांडवल सूलभता आणि खेळते भांडवल, पर्याप्त जोखीम व्यवस्थापन आणि मूल्यांकन प्रणाली, वेगळे व्यवसाय मॉडेल, भारतीय बाजारपेठेकडे अधिक लक्ष, प्रभावी विक्रेत्याचे जाळे या घटकांमुळे होम क्रेडिटला हे चांगले रेटिंग मिळाली आहे. त्याचबरोबर छोट्या घरांसाठी भारतातील वातावरण पूरक होत आहे. त्याला सरकारकडूनही पाठींबा मिळत आहे.

त्यामुळे या कंपनीला आगामी काळात चांगली संधी असल्याचे सांगितले जाते. योचा योग्य फायदा घेतला जात असल्यामुळे होम क्रेडिटला चांगला व्यवसाय मिळत आहे. त्यातल्या त्यात मोबाइलसाठी दिलेल्या कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. केअर रेटींग कंपनीने म्हटले आहे, की प्रवर्तककाकडून वेळोवेळी आवश्‍यक भांडवल पुरवठा होत असल्यामुळे किमान भांडवल पर्याप्तता प्रमाण आवश्‍यक 15 टक्‍केपेक्षा जास्त म्हणजे 26.33 टक्‍के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)