धक्कादायक: पाच वर्षीय चिमुरडीवर 40 वर्षाच्या नराधमाचा अमानुष बलात्कार

सविंदणे : टाकळीहाजी ता.शिरूर येथील येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्या पाच वर्षीय मुलीवर एका ४० वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दादू रामदास माळी (वय -४० वर्ष )रा. टाकळीहाजी या नराधमाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दादू माळी याने फिर्यादी यांच्या वस्तीलगत असलेल्या अंगणात खेळत असलेला पाच वर्षीय मुलीला उचलूने नेवून तिच्यावर दि. ३ रोजी सांयकाळी ६ते ७या दरम्यान घोडनदी पात्रालगत अमानुषपणे जबरी शारीरीक संभोग केला.

खेळत असलेली मुलगी घरात आली नाही म्हणुण शेजारच्यांच्या मदतीने तीचा घोडनदीपात्रालगत शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती मुलगी घोडनदी काठालगत रडत असल्याचा आवाज आला. या मुलीजवळ दादू रामदास माळी हा बसलेला दिसला. बॅटरीचा उजेड पाहून तो पळून गेला. मुलीच्या गुडघ्याला खरचटल्याचा जखमा होत्या. मुलगी घाबरून शांत पडली होती. तीला तातडीने गावातील डॉ. थोरात यांच्या दवाखान्यात हालवण्यात आले.

तिच्यावर जबरी संभोग झाल्याने गुप्त भागातून रक्तस्त्राव होत असल्याने तीला पुढील उपचारासाठी पुणे येथिल ससुन हॉास्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. शिरूर पोलिस स्टेशनमध्ये पॉस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी दोनच तासात गजाआड केले असून, पुढिल तपास पोलिस निरीक्षक प्रवीण खानापूरे हे करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.