पाच वर्षीय बालिकेवर ज्येष्ठाकडून लैंगिक अत्याचार

पिंपरी  (प्रतिनिधी) – चॉकलेट देण्याच्या बहाण्याने दुकानात बोलावून एका पाच वर्षीय बालिकेवर ज्येष्ठ नागरिकाने लैंगिक अत्याचार केला. हि घटना शुक्रवारी (दि. ६) दुपारी पिंपरी येथे घडली.

भाऊराव ऊर्फ आप्पा बळीराम खरात (वय ६७, रा. अण्णासाहेब मगर स्टेडिअम समोर, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 53 वर्षीय महिलेने शनिवारी (दि. ७) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आरोपी खरात याने फिर्यादी यांच्या पाच वर्षीय नातीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या किराणा मालाच्या दुकानात बोलविले. त्यानंतर दुकानात बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. जाधव याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.