पुणे(प्रतिनिधी) : झाडाची फांदी कोसळून पाच महिला जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अंबील ओढा काॅलनी समोरील एस.पी.एम शाळेच्या चाैकात घडली.
सायंकाळच्या वेळी काही महिला झाडाखालील फुटपाथवर बसल्या होत्या. त्यावेळी अचानक झाडाची मोठी फांदी कोसळून खाली पडली. यामध्ये दोन महिलांना किरकोळ मार लागला असून, तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
जखमी महिलांना नागरिकांच्या मदतीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जनता वसाहत फायर स्टेशन मधील जवानांनी घटनास्थळी धाव घेत फांदी बाजूला करून रस्ता मोकळा केला.