कास तलाव परिसरात होणार पाच हजार वृक्षांची लागवड

सातारा – कास तलाव परिसरात तब्बल पाच हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला आहे. सदाहरित व डेरेदार राहणारे वृक्ष आणि संवर्धन हा विषय कास तलाव व तेथील पर्यावरणाची जपणूक या दृष्टीने महत्वाचा आहे.

चिंच जांभूळ वड तसेच पुष्प रहित प्रवर्गातीत वृक्षांच्या रोपे खरेदीसाठी दापोली कृषी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेअंर्तगत सातारा पालिकेला तेराशे झाडांचे वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यासाठी शहरातील बावीस ठिकाणांवर अडीच हजार खड्ड्यांचे नियोजन केले गेले आहे. पालिकेच्या वृक्ष विभागाकडून केल्या जाणाऱ्या या अंमलबजावणीचे खरे सूत्रधार पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ असून वृक्षारोपणाची मोठी मोहिम लवकरच राबवली जाणार आहे.

हुल्लडबाजांना हवी पर्यावरणपूरक नियमावली

पर्यटकांना निसर्गस्नेही नियमावली घालून द्यावी. त्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा नेमावी, अशी मागणी ड्रोंगो या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अमृत योजनेतून साताऱ्यात लावलेल्या झाडांची योग्य देखभाल करण्यासंदर्भात पालिकेस योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ड्रोंगोचे अध्यक्ष सुधीर सुकाळे, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, कन्हैयालाल राजपुरोहित, शैलेन्द्र पाटील, सचिन तिरोडकर व सागर पारखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

निवेदनात त्यांनी रराहिलेला नाही. गेल्यावर्षी लोकसहभागातून कास स्वच्छतेची मोहिम राबविली. यात सुमारे 5 हजार गोणी प्लास्टिक कचरा, बाटल्या, थर्माकोल, सॅनिटरी नॅपकीन, कंडोम्स, काचा आदी कचरा तीन महिन्यापूर्वी झालेल्या मोहिमेत गोळा झाला होता. या मोहिमेनंतरही पालिका प्रशासनाने कास स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने कोणतीच पावले उचलली नाहीत. कासमध्ये प्लास्टिक कचरा पडू नये. उपद्रवी लोकांना योग्य शिस्त लागावी. याकरिता कोणतीही पर्यावरणस्नेही नियमावली अस्तित्वात नाही. नगरपालिका प्रशासनाने यासंदर्भात तातडीने उपाययोजना राबवण्याबाबत योग्य सूचना देण्यात याव्यात.”

कास तलाव परिसराचा सांडवा, पालिकेचा जुना बंगला, तसेच विविध ठिकाणी सुमारे पावणेतीन हेक्‍टरवर पाच हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. शासकीय रोपवाटिकेत इतकी रोपे नसल्याने दापोली कृषी विद्यापिठाकडे संचित धमाळ यांनी पत्रव्यवहार केला आहे. वड जांभूळ, गोरखचिंच, बहावा, गुलमोहोर तसेच इं. गौषधी वनस्पतींच्या लागवडीचे नियोजन असून पदाधिकारी व अधिकारी सुद्धा या मोहिमेत सहभागी होणार आहेत. नगराध्यक्षा माधवी कदम यांना हा आराखडा सादर केला जाणार आहे.

साताऱ्यात अमृत योजनेतून गेल्यावर्षी प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण व त्याचे दोन वर्षे संवर्धन याची जबाबदारी मक्तेदाराची आहे. मक्तेदाराने जबाबदारी झटकल्याने रोपे सुकलेली आहेत. ट्री गार्ड मोडून गेले आहेत. भटक्‍या गाईंमुळे झाडाची पाने खुडलेली असतात. वाढ खुंटलेली आहे. लावलेल्या रोपांची योग्य निगा राखत नाही. त्याच्या संरक्षणाची तसेच रोप मरुन गेल्याच्या पर्यायी वृक्षारोपणाची हमी घेत नाही.

झाडांच्या संरक्षणासाठी वापरलेले ट्री गार्ड कमकुवत व तकलादू आहेत. सर्वच ठिकाणी हे ट्रीगार्ड तुटलेल्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी ते गायब आहेत. वेळच्यावेळी पाणी न मिळाल्याने रोपे सूकून गेली आहेत. संबंधित मक्तेदार व पालिका प्रशासन आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडत नसल्याने वृक्षारोपणासाठी झालेला लाखो रुपये खर्च वाया जाण्याची भीती आहे.

कासला युनेस्कोने “वल्ड हेरिटेज साईट’ असा दर्जा दिला असल्याने याठिकाणी कोणतेही प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची व नगरपालिकेची आहे. यामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा होत असल्याची खात्री झाल्यास संविधानिक अधिकारांचा वापर करुन न्यायालयाचे लक्ष वेधावे लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

ही वाट फुलांमध्ये जाते…जागतिक हेरिटेज असणाऱ्या कास पठारावर पर्यटकांना फुले पाहण्यासाठी मातीच्या पाऊलवाटेने जावे लागत होते. त्यामुळे बऱ्याचदा घसरड्या वाटेतून पर्यटक घसरुन पडत असत. तसेच सापांपासून सुद्धा धोका होता म्हणून वन विभागाने आता त्या सर्व पाऊलवाटांवर जांभांच्या विटा लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. (छाया : संजय कारंडे )
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)