प्रभात व निसर्ग कट्टातर्फे आयोजन : उत्स्फूर्त प्रतिसादात नेत्रदीपक सोहळा
बारामती – दैनिक प्रभात व निसर्ग कट्टा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंचतारांकित दांडियाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील जयश्री गार्डन येथे हा नेत्रदीपक सोहळा जल्लोषात पार पडला. सेलिब्रिटी कलाकार, आकर्षक विद्युत रोषणाई व संगीताच्या तालावर ठेका धरत दांडिया, गरब्याचा मनमुराद आनंद तरूणाईने लुटला. अवघी तरूणाई संगीताच्या तालावर दांडियात तल्लीन होऊन गेली होती.
दांडिया उत्सवाचे उद्घाटन भाऊराव कऱ्हाडे व टीम ख्वाडा राष्ट्रपतिपदक विजेता बबन व नवीन चित्रपट टीडीएम व हैदराबाद कस्टडीचे कलाकार जय पाटील, प्रताप चव्हाण, हरिभाऊ काळे, आशिष खत्री, योगेश दुधाळ, धनंजय जमादार, डॉ. विशाल मेहता, दादासाहेब दराडे, दीपक काटे, अमर धुमाळ, अमर महाडिक, प्रमोद ठोंबरे, राहुल जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
दांडियाच्या उद्घाटनानंतर तरुणाईत जल्लोष आणि उत्साह दाटून आला होता.
बारामती शहरात महिनाभर प्रतीक्षा असलेल्या दांडिया सोहळ्यास सुरुवात झाल्यानंतर उत्सवात रंग भरला. सायंकाळी विद्युत रोषणाईत नृत्यावर तरुण- तरुणी, महिला, बालगोपाळांचा सहभाग हुरूप वाढविणारा ठरला. उत्तरोत्तर हा सोहळा बहरत गेला. तीन तास सुरू असलेल्या सोहळा तरुणाईने सेल्फीत चित्रबद्ध केला. प्रभातच्या दांडिया सोहळ्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
बारामती शहरासह तालुक्यात दांडिया सोहळ्याची सर्वत्र चर्चा झाली होती. याचबरोबर प्रभातच्या माध्यमातून वाचकांप्रती बांधिलकी जपत सामाजिक भान जपत गरजू विद्यार्थी- विद्यार्थिनींना मदतीचा हात देण्यात आला. सायंकाळी तरुण- तरुणी, महिला, बाळगोपाळांसह कुटुंब, मित्र परिवार हे कार्यक्रमस्थळी दाखल होत होते. संपूर्ण परिसर गर्दीने व्यापून गेला होता.
प्रभात व निसर्ग कट्टा यांच्या वतीने पंचतारांकित दांडियाच्या सोहळ्यात चव्हाण बिल्डर्स, आनंद एंटरप्राइजेस, खत्री खाटमोडे असोसिएट्स, आदित्य ग्रुप बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स, जे. बी. एस सराफ, मेहता हॉस्पिटल, क्वाटीन्ट, बारामती सायकल क्लब, काटे मोटर्स, जाचक टायर्स, मुक्ताई टेक्सटाईल, बारामती ट्रेकर्स क्लब, दुर्ग भ्रमंती, वैष्णवी ग्राफिक्स, स्वराज फर्निचर, रॉयल किचन हाऊस, शिव क्रिएटिव्ह, एन. बी. कंट्रक्शन, श्री. कन्स्ट्रक्शन आदी प्रायोजकांचा सहभाग द्विगुणीत करणारा ठरला होता.
बारामतीकरांकडून कौतुकाचा वर्षाव
प्रभात आणि निसर्ग कट्टा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दांडियाला भरघोस प्रतिसाद मिळाला. जगातील सर्वांत मोठा दांडिया उत्सवाकडे पाहिले गेले. अभूतपूर्व उत्साह आणि जल्लोषात दांडियाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. आयोजकांच्या नेटक्या आयोजनाचे बारामतीकरांनी कौतुक केले.
प्रायोजकांचे योगदान
चव्हाण बिल्डर्स, आनंद एंटरप्राइजेस, खत्री खाटमोडे असोसिएट्स, आदित्य ग्रुप बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स, जे. बी. एस सराफ,मेहता हॉस्पिटल, क्वाटीन्ट, बारामती सायकल क्लब, काटे मोटर्स, जाचक टायर्स, मुक्ताई टेक्सटाईल, बारामती ट्रेकर्स क्लब, दुर्ग भ्रमंती, वैष्णवी ग्राफिक्स, स्वराज फर्निचर, रॉयल किचन हाऊस, शिव क्रिएटिव्ह, एन. बी. कंट्रक्शन, श्री. कन्स्ट्रक्शन यांनी योगदान दिले. त्यामुळे कार्यक्रम नेटका झाला.
प्रभात डिजिटलवरून थेट प्रक्षेपण
प्रभात डिजिटलवरून बारामती शहरातील पंचतारांकित दांडियाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. तब्बल तीन तास हा सोहळा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटलची टीम सज्ज झाली होती. उद्घाटन सोहळ्यानंतर क्षण अन् क्षण डिजिटलने अवघ्या बारामतीकरांपर्यंत पोहोचविले आहेत. दांडिया, गरबावर तरुणाईने ठेका धरला होता. डिजिटलने वाचकांसाठी आणि रसिकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली. यावेळी प्रभात डिजिटलने थेट प्रक्षेपण करून हा सोहळा घराघरांत पोहोचविल्याबद्दल मान्यवरांनी आभार मानले.
पारितोषिकाचे मानकरी
ग्रुप डान्स- नेहा पाद्ये फिटनेस ग्रुप, मुक्ती ग्रुप, रास गरबा ग्रुप, ब्लॅक रोझ, स्वप्नशिल्प ग्रुप, जयंती ग्रुप, एबीसीडी ग्रुप, ड्रीम्स ग्रुप, गरबा ग्रुप. सोलो प्राइज- बिकी दास- सुनीता कसबे, सुमिता सायबा, जयंती सायबा, अंजलिना, शर्मिष्ठा चव्हाण, कशिश यादव, मानसिक चव्हाण, सुजल बर्गे, सिया जगताप, पार्थ खराडे, राजवीर बारवकर, आनंद कुमारी, संस्कृती बरगे, स्मॉल किड्स- बेस्ट डान्स- त्रिषा कदम, प्रिषा कदम.
अवघी तरुणाई थिरकली
दांडिया उत्सवात गरबा नृत्य करताना अवघी तरुणाई थिरकली. शहर तालुका परिसरातील गरबा नृत्य करणाऱ्या शंभरहून अधिक ग्रुपने सहभाग नोंदवला. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी दांडिया नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. गेल्या महिन्यांपासून पंचतारांकित दांडियाची अवघ्या शहराला उत्सुकता लागून राहिली होती. प्रत्येकजण उत्सवाची प्रतीक्षा करीत होता. दांडिया सोहळ्यासाठी अवघी तरुणाई आतुरलेली होती. सायंकाळी भिगवण रोडवरील जयश्री गार्डनकडे तरुण- तरुणी, महिलांची पावले वळू लागली. यावेळी भाऊराव कऱ्हाडे, सुवर्णा चौथे हे मुख्य कलाकार आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्याने सोहळा लक्षवेधी ठरला.
शहरातील मोठ्या गर्दीचा उच्चांक
प्रभात आणि निसर्ग कट्टाने आयोजित केलेल्या दांडियाच्या तिसऱ्या वर्षात गर्दीचा उच्चांक मोडला. बारामती शहरात अनेक ठिकाणी दांडियाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये यंदाच्या वर्षी प्रभात आणि निसर्ग कट्टाने आयोजित केलेल्या दांडियाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. तीन हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. सर्वत्र उत्साह, तरुणाईतील जोश ओसंडून वाहत होता. ग्रुप – ग्रुपने तरुणाई कार्यस्थळी येत होत्या.
भविष्यात विविध सामाजिक उपक्रम
दैनिक प्रभातचे बारामती तालुका प्रतिनिधी प्रमोद ठोंबरे म्हणाले की, दैनिक प्रभात व निसर्ग कट्टाच्या माध्यमातून बारामती शहरात दांडिया आयोजनाचे तिसरे वर्ष होते. या महोत्सवाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दैनिक प्रभात व डिजिटल प्रभातला बारामतीकरांचा वाढता प्रतिसाद आहे. प्रभातने नेहमीच समाज आणि वाचकांप्रती सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आगामी काळातदेखील बारामतीत प्रभातच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातील.
मोठा प्रतिसाद हीच पोचपावती – जगताप
आर. जे. फिल्म, निसर्ग कट्टाचे प्रमुख राहुल जगताप म्हणाले की, प्रभात व निसर्ग कट्टाच्या वतीने पंचताराकिंत दांडियाला नागरिकांनी मोठी पसंती दिली. जयश्री गार्डन येथील दांडिया महोत्सव सोहळा हा प्रभातमुळे घराघरात पोहोचला आहे. शिस्तबद्ध व नेटके, यशस्वी आयोजनामुळे हा सोहळा सर्वांच्या मनात घर करून गेला होता. सेलिब्रेटींसह शहर व तालुक्यातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. त्यामुळे सोहळ्यातील उत्साह ओसंडून वाहत होता. तरूणाईच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जोपासत पाच विद्यार्थिनींना सायकल भेट देण्यात आली. दहा विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले.