पिंपरी – नागरिकांच्या आपसातील भांडणामुळे पिंपरी-चिंचवडमधील पाच पोलिसांना क्वॉरंटाइन होण्याची वेळ आली आहे. किरकोळ भांडणाच्या प्रकारात पोलिसांनी एका नागरिकाला पोलिस चौकीत आणून बसविले. आता ‘तो’ नागरिक करोना बाधित असल्याचे समोर आले आहे. आता पाच पोलीस क्वॉरंटाइन झाले आहेत.
भांडण करणाऱ्या नागरिकाला पोलिसांनी चौकीत आणून बसविले. त्याचा राग शांत झाल्यावर काही तासांनी त्यास समज देऊन सोडून दिले. आता ‘तो’ नागरिक करोना बाधित असल्याचे समोर आले आहे. चौकीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सहा जणांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. त्यातच हा नवीन प्रकार समोर आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.