संशयित सातारा, कोरेगाव, पुण्याचे; एकूण सहा संशयितांचा समावेश
सातारा: सोमवारी मध्यरात्रीही शहरालगत वाढे फाटा येथे वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित भोसले यांचा फायरिंग करत गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला.
हल्लेखोरांनी एकूण सहा गोळ्या भोसले यांच्यावर झाडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा धारदार शस्त्राने गळा चिरला होता. त्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी पथके तयार करून संशयितांचा मागोवा घेणे सुरू केले होते.
दरम्यान अमित भोसले खून प्रकरणातील काही संशयित हे गोवा राज्यात असल्याची माहिती सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी मिळाली होती. त्यानुसार घोडके यांनी गोवा राज्यातील पोलिसांना याबाबत माहिती देवून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास कळवले होते.
त्यानुसार हांजूने पोलीस ठाणेदार प्रशांत देसाई यांनी संशियाना बोलेरो गाडीतून जाताना ताब्यात घेतले. याबाबत सातारा तालुका पोलिसांना कलवल्यावर तालुका पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख हे माध्यमांना आज सविस्तर माहिती देणार आहेत.