पुणे – पत्नीवर संशय घेऊन बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याप्रकरणात सासरा, सासू व नणंदेला न्यायालयाने अटकपुर्व जामीन मंजूर केला. तर पोलिसांनी अटक केलेल्या पती आणि नणंदेच्या पतीला नियमित जामीन विशेष न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी दिला.
या प्रकरणात अटकपूर्व आणि नियमित जामीन मिळावा म्हणून पाच जणांनी अॅड. सुदीप केंजळकर यांमार्फत न्यायालयात अर्ज केला होता.
चिंचवड येथे 2 जुलै 2018 ते 30 ऑगस्ट 2021 या कालावधीत ही घटना घडली. पतीच्या बहिणीच्या नवऱ्यानेच जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकरणी 28 वर्षीय महिलेने चिंचवड पोलिसात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पीडितेचा नवरा, सासरा, सासू, नणंद आणि नणंदेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार, विवाहितेचा छळ, धमकाविणेसह विविध कलमाने हा गुन्हा दाखल आहे.
त्यापैकी पती आणि नणंदेच्या पतीला पोलिसांनी अटक केली होती.
त्या दोघांना 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नियमित, तर उर्वरित तिघांना या तिघांना अंतरिम अटकपूर्व मंजुर करण्यात आला आहे. विविध अटी आणि शर्तीवर न्यायालयाने हा निकाल दिला.