मांडवे दरोडाप्रकरणी पाचजणांना बेड्या

संशयित खटाव तालुक्यातील; सराईत चोरट्यांचा समावेश
सातारा – खटाव तालुक्यातील मांडवे येथे दि. १ जुनच्या पहाटे दरोडा टाकुन पसार झालेल्या दरोडेखोरांना अखेर पोलीसांनी बेड्या ठोकल्या. नागेश सदाशिव काळे, रुतुराज भावश्या काळे, झाकीर काळे, करण वरिसर्‍या काळे, संकेत अनंत काळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

(ता. खटाव) येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत बर्गे वस्तीत दोघांना जखमी करीत टाकलेल्या दरोड्यात सोन्याच्या दागिन्यांसह 47 हजारांचा ऐववज लंपास केला होता. त्याच रात्रीत आणखी दोन ठिकाणी चोऱ्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्यापैकी एका घटनेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले तर दुसऱ्या ठिकाणी वयस्कर व्यक्तीच्या शर्टसह खिशातील रोख रक्कम पळवून नेली होती. या दरोड्यानंतर पोलीस दलाने आरोपींच्या मागावर पथके रवाना केली होती. अखेर आठ दिवसानंतर मांडवे दरोड्यातील पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड, सागर गवसणे, सहा. फौजदार विलास नागे, हवालदार सुधीर बनकर, आनंदराव भोईटे, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन भोसले, प्रविण फडतरे, योगेश पोळ, राजू ननावरे, प्रमोद सावंत, रवि वाघमारे, विशाल पवार, संतोष जाधव, मोहन नाचण, प्रविण कडव, विक्रम पिसाळ, वैभव सावंत , मुनीर मुल्ला, अमित माने, स्वप्नील कुंभार, सुकेश नावडकर, मारुती अडागळे, शिरतोडे यांनी सहभाग घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.