जम्मू-काश्मीर – जम्मू-काश्मीमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री हल्ला केला. या घटनेमध्ये बिगर काश्मिरी पाच मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंनतनाग येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
CRPF: Unidentified terrorists shot dead 5 labourers and injured 1. The injured was evacuated to district hospital Anantnang. All the labourers were reportedly from Murshidabad, West Bengal. Troops of 18 Battalion Army and J&K Police reached the spot and cordon and search started https://t.co/NvSR3kJJar
— ANI (@ANI) October 29, 2019
दरम्यान, हे सर्व मजूर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याचे रहिवासी होते. ते काश्मीरमध्ये मजूरीचे काम करत होते. या घटनेनतंर 18 बटालियन सैन्यदल आणि जम्मू-काश्मीर पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान या परिसरात नाकेबंदी करण्यात आली असुन शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.