पिंपरीत आणखी पाच रुग्ण आढळले

विभागीय आयुक्‍त : नागरिकांनी खबरदारी पाळण्याचे आवाहन


आणखी 9 जणांचे नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत

पुणे – राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवलेल्या 23 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे गेल्या 24 तासांत एकही करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. तरीही अन्य संशयितांची माहिती घेऊन, तपासणी केली जात आहे. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वच्छता आणि स्वत:च्या खबरदारीबाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. भगवान पवार उपस्थित होते.

पुणे शहरात आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या 10 झाली असून, त्यामध्ये पुणे शहरातील 7 आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तिघांचा समावेश आहे. विविध देशांतून पुणे शहरात आतापर्यंत 760 प्रवासी आले आहेत. त्यातील 262 जणांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने एनआयव्हीकडे पाठवल्यानंतर 253 प्रवाशांचे नमुने निगेटिव्ह आले असून, 240 जणांना 14 दिवसांचे निरीक्षण पूर्ण झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 13) 23 संशयित व्यक्‍तींचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी सर्वच नमुने निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी दिवसभरात नव्याने 9 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, त्याचा अहवाल

…निगेटिव्ह असल्याचे सांगून आम्हाला सोडा
करोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसर किंवा सोसायटीतील व्यक्‍तींना घरीच थांबण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. पुढील 14 दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मात्र, काही नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाला फोनवरून संपर्क साधत “आम्हाला येथून घेऊन जा, आमची तपासणी करा आणि आम्ही निगेटिव्ह असल्याचे सांगून आम्हाला मुक्‍त करा’ अशी विनंती नागरिकांकडून केली जात आहे. परंतु तसे करता येणार नसल्याचे स्पष्ट सांगून 14 दिवसांचे निरीक्षण पूर्ण केले जाणार असल्याचे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

गेल्या 24 तासांत एकही बाधित नाही
संध्याकाळपर्यंत येईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, 10 रूग्णांवर स्वतंत्र आयसीयू विभागात उपचार सुरू असून, अन्य 12 रुग्णांवर विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री एयर इंडिया आणि एयर कारगोचे विमान परदेशांतून आले होते. त्यामध्ये एकूण 112 लोक असून, ते बाधित देशांतून आलेले नाहीत. तरीही, त्यांची तत्काळ तपासणी करून सर्व माहिती घेतली. यावेळी एका व्यक्तीने स्वत:हून पुढे येऊन त्याला त्रास होत असल्याची माहिती दिली, त्यामुळे त्याला नायडू रुग्णालयात दाखल केले आहे. आजाराचे गांभीर्य लक्षात घेता परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांबाबत केंद्राने नव्याने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती म्हैसेकर यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.