नांदेड : नांदेड जिल्ह्यात 113 व्यक्तींच्या तपासणी अहवालापैकी 108 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 5 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही 143 झाली आहे. या रुग्णावर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
जिल्ह्यात एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथील 8 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील 1 रुग्ण असे एकूण 9 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 143 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 99 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरित 36 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 2 स्त्री रुग्ण वय वर्षे 52 व 55 यांची प्रकृती गंभीर आहे.
शुक्रवारी सांयकाळी 5-00 पर्यंत आढळलेले 5 पॉझिटिव्ह रुग्ण हे पुढील भागातील आहेत.
मिल्लत नगर भागातील 32 वर्षाचा 1 पुरुष रुग्ण, लोहार गल्ली भागातील 28 वर्षे वयाचा 1 पुरुष रुग्ण, मुखेड येथील गोळी गल्ली येथील 40 वर्ष वयाची 1 स्त्री रुग्ण व कळमनुरी जि. हिंगोली येथील 38 वर्ष वयाचा 1 पुरुष रुग्ण तर 35 वय वर्षाची 1 स्त्री रुग्ण यांचा 5 रुग्णात समावेश आहे. यापैकी 4 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. मुखेड येथील एका महिला रुग्णाचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , नांदेड येथे मृत्यू झाला आहे.