लष्करच्या पाच अतिरेक्‍यांना काश्‍मीरात अटक

श्रीनगर : जम्मू काश्‍मिरमधील बारामुला जिल्ह्यातील सोपोरे भागातून पाकस्थित लष्कर – ए – तोयबाच्या पाच अतिरेक्‍यांना अटक करण्यात आली. सुरक्षा दलांसह पोलिसांना राबवलेल्या विशेष मोहीमेत हे अतिरेकी जाळ्यात सापडले.

लष्कर ए तोयबाचे येथील जाळे उद्‌ध्वस्त करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या पाच जणांपैकी दोघे टेहळणी करत असत. तर तीन जण स्थानिकांना धमकावून निदर्शने करण्यास भाग पाडत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टेहळणी करणाऱ्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

या पुर्वी ऑक्‍टोबर महिन्यात आवंतीपोरा शहराबाहेर सुरक्षा दलांनी लष्कर – ए – तोयबाच्या अतिरेक्‍याला चकमकीत टीपले होते. त्याची ओळख पटवण्यात यश आले होते. त्याचे नाव उफैद फारूक लोने असे होते. काश्‍मिर खोऱ्यात अलिकडेच झालेल्या बॉम्बस्फोटात तो सहभागी असल्याचे तपासात आढळून आले होते.त्याच दिवशी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आरएसपुरा भागातून एका पाकिस्तानी घुसखोराला ताब्यात घेतले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)