श्रीनगर : जम्मू काश्मिरमधून कलम 370 हटवल्यानंतर दि. पाच ऑगस्टपासून स्थानबध्दतेत असणाऱ्या पाच राजकीय नेत्यांची सुटका जम्मू काश्मिर प्रशासनाने सोमवारी केली. हे नेते नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि कॉंग्रेसशी संबंधित आहेत.
त्यात इश्फाक जब्बर, गुलाम नबी भट, बशीर मीर, झाहूर मीर आणि यासीर रेशी या नेत्यांचा समावेश आहे. यातील रेशी हे पीडीपीचे बंडखोर नेते आहेत. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्यासमोर बंडाचे आव्हान उभे केले होते.
यापुर्वी 25 नोव्हेंबरला दिलवर मीर आणि गुलाम हसन मीर या दोन नेत्यांची स्थानबध्दतेतून सुटका करण्यात आली. दरम्यान, सर्वोच्च न्यायलयात काश्मीर उच्च न्यायलयाने बाल संरक्षण न्यायिक अहवाल सादर केला. त्यावर सर्वोच्च न्यायलयाने समाधान व्यक्त केले. कीाश्मरातील परिस्थिती निवळण्यासाठी तेथील नेत्यांना स्थानबध्दतेतून मुक्त करावेत, अशी मागणी होत आहे.