अमेरिकेत फुड फेस्टीव्हलमध्ये गोळीबाराच्या घटनेत पाच ठार

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एका फुड फेस्टीव्हलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत 5 जण ठार झाले असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कॅलिफोर्नियाच्या गिलरॉल गार्लिक महोत्सवादरम्यान घडली आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

कॅलिफोर्नियामध्ये वार्षिक फुड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अचानक एका व्यक्‍तीन गोळीबार सुरू केला. दरम्यान, घटनास्थळावरील जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेची दखल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली असून याविषयी एक ट्‌विट करत त्यांनी पोलिस यंत्रणा शुटरला शोधण्याचा प्रयत्न करत असून अजून त्याला शोधण्यात यश आले नाही त्यामुळे सर्वांनी सुरक्षित रहा असे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.