जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी : पाच जखमी

कराड -शेरे ता. कराड येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये पाच जण जखमी झाले असून तिघेजण गंभीर आहेत. रविवार, दि. 23 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

विकास विश्वनाथ यादव, शशिकांत उर्फ किरण विश्वास यादव व चंद्रकांत उर्फ आबा काशिनाथ यादव हे या मारामारीत गंभीर जखमी असून शेखर शशिकांत यादव व श्वेता शशिकांत यादव हे किरकोळ जखमी आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शेरे येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये चंद्रकांत काशिनाथ यादव, संजय काशिनाथ यादव, नंदकुमार काशिनाथ यादव, ऋषिकेश संजय यादव व निहांत नंदकुमार यादव यांनी कुऱ्हाड, लोखंडी गजाचा वापर करुन केलेल्या मारहाणीत शशिकांत यादव व विकास यादव हे गंभीर जखमी झाले. तर शेखर यादव व श्वेता यादव या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

याबाबत शशिकांत यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुरूहोती. तर शशिकांत यादव, विकास यादव, शेखर यादव व श्वेता यादव यांनी कुऱ्हाड व लाथा- बुक्क्‌यांनी केलेल्या मारहाणीत चंद्रकांत उर्फ आबा काशिनाथ यादव हे गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रकांत यादव यांच्या फिर्यादीवरुन संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.