नारायणगाव (वार्ताहर) – वारूळवाडी येथील एका प्रतिष्ठित सोसायटीचे अध्यक्ष आणि नारायणगाव पाच जणांचे अहवाल सोमवारी (दि. 13) पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.
वारूळवाडीतील संबंधित व्यक्ती राज्यस्तरीय असलेल्या को ऑप बॅंकेच्या मंचर शाखेत कार्यरत आहेत. या सोसायटीने गेली 4 महिन्यांपासून अतिशयक काळजीपूर्वक व काटेकोरपणे पालन करून करोनाला सोसायटीमध्ये येणास मज्जाव केला होता. अखेर या सोसायटीच्या अध्यक्षांनाच करोनाची बाधा झाली आहे. तसेच नारायणगाव येथील करोनाबाधित सलून व्यवसायिकाच्या मुलीसह इतर पाच जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात डॉ. गुंजाळ म्हणाल्या की, सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास तात्काळ आरोग्य विभाग किंवा आपल्या खासगी डॉक्टरांना भेटून तपासणी करून घ्या; परंतु असे होताना दिसत नाही असे लक्षणे आल्यावर घरगुती उपचार केले जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. अशी लक्षणे अंगावर काढून जीव धोक्यात घालीत आहेत, असे त्यांनी नमूद केले.