विशेष गटातील पावणेपाच लाख जणांचे लसीकरण

पुणे -जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा काही प्रमाणात सुरळीत होत आहे. त्यामुळे लसीकरणाला गती मिळाली असून, त्यामध्ये विशेष गटातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत 4 लाख 72 हजार 768 विशेष गटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये ग्रामीणमध्ये सर्वाधिक 2 लाख 9 हजार 504 जणांचे लसीकरण झाले आहे.

विशेष गटातील लसीकरणामध्ये दिव्यांग, तृतीयपंथी, गरोदर माता, अंथरुणावर असलेल्यांचा समावेश आहे. तसेच परदेशी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि औद्योगीक क्षेत्रातील कामगारांसाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. गरोदर मातांचे लसीकरण दि. 9 जुलैपासून सुरू झाले आहे.

त्यामध्ये आतापर्यंत एकूण 1 हजार 379 गरोदर महिलांना लस देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे शहरात 291, पिंपरी-चिंचवडमध्ये 174 तर ग्रामीणमध्ये सर्वाधिक 914 महिलांना लस देण्यात आली आहे. तसेच दिव्यांगांचे लसीकरणाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत 21 हजार 925 जणांचे लसीकरण झाले असून, त्यामध्ये ग्रामीणमध्ये 15 हजार 182 जणांचे लसीकरण झाले आहे.vac

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.